कार्यक्रमानंतर धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची धर्मप्रेमींची मागणी
सोलापूर : येथील संयुक्त मित्र मंडळाच्या वतीने येथे २६ जानेवारीनिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके आणि सौ. राजश्री देशमुख यांना आमंत्रित करण्यात आले होते. श्री. विक्रम घोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मंडळाच्या कार्यकर्त्यांना सोलापूर येथे ७ फेब्रुवारीला होणार्या हिंदु धर्मजागृती सभेची माहिती देऊन सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी सहकुटुंब सभेला उपस्थित राहू, असे सांगितले. या वेळी त्यांनी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. दुर्गदास कुरापाटी यांनी विशेष प्रयत्न केले. या वेळी अष्टविनायक तरुण मंडळ, संयुक्त मित्र मंडळ यांचे ६५ कार्यकर्ते उपस्थित होते.
सोलापूर येथील ज्ञानप्रबोधन विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेकडून सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक !
सोलापूर : येथील मासाळनगर, विजापूर रस्ता, ज्ञानप्रबोधन शाळेत हळदी-कुंकू कार्यक्रम नुकताच पार पडला. या कार्यक्रमात सनातन संस्थेच्या सौ. सुधा घाटगे यांना निमंत्रित करण्यात आले होते. सौ. घाटगे यांनी मकरसंक्रांतीचे धर्मशास्त्र, वाण देण्याचे महत्त्व सांगितले, तसेच हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रणही दिले. या वेळी ११५ महिला उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका सौ. उपाध्ये यांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक करून सौ. सुधा घाटगे यांचा सत्कार केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात