सोलापूर : येथे ७ फेब्रुवारीला होणार्या हिंदु धर्मजागृती सभेचे निमंत्रण भाजपचे नेते तथा सहकारमंत्री श्री. सुभाष देशमुख यांना हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी दिले. या वेळी समितीचे श्री. राजन बुणगे, श्री. यशपाल वाडकर, सनातनचे श्री. हिरालाल तिवारी हेही उपस्थित होते. या वेळी श्री. सुभाष देशमुख यांनी सभेला उपस्थित रहाण्याचे आश्वासन देऊन हिंदु जनजागृती समितीला माझा पाठिंबा आहे, असे सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात