Menu Close

सोलापूर येथे होणार्‍या धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी ठिकठिकाणी धर्मप्रेमींच्या बैठकांचे आयोजन

सोलापूर : धर्मजागृती सभेच्या प्रसारानिमित्त जिल्ह्यातील मुळेगाव येथे श्री महालक्ष्मी मंदिरात २६ जानेवारीला धर्मप्रेमींची बैठक घेण्यात आली. ही बैठक आयोजित करण्यासाठी येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. धर्मेंद्र गवळी यांनी विशेष साहाय्य केले. या वेळी बैठकीतील उपस्थित धर्मप्रेमींनी गावात लावण्यासाठी ५० भित्तीपत्रके उत्स्फूर्तपणे मागितली. हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजित धुळाज आणि सौ. अनिता बुणगे यांनी विषय मांडला.

सोलापूर येथील समाधाननगर येथील श्री गुरुलिंग स्वामी मठ येथे सौ. अलका व्हनमारे यांनी सभेचा विषय मांडला. हा विषय ऐकून हिंदुत्वनिष्ठ श्री. विलास वाघे यांनी ३१ जानेवारीला १०० मुलांसमवेत बैठकीचे आयोजन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *