Menu Close

श्री शिवप्रतिष्ठान, हिदुस्थानची प्रतापगड ते रायरेश्‍वर धारातीर्थ यात्रा मोहीम

सहस्रो धारकरी आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत आज मोहिमेचा समारोप

सातारा : श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या धारातीर्थ यात्रा तथा गडकोट मोहिमेचा समारोप ३० जानेवारीला रायरेश्‍वराच्या कुशीत वसलेल्या जांभळी (तालुका वाई) येथे होत आहे. पू. संभाजीराव भिडेगुरुजींचे या प्रसंगी होणारे मार्गदर्शन शिवप्रेमींसाठी उद्बोधक असणार आहे. या प्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे आणि खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांसह अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या वर्षी २६ ते ३० जानेवारी या कालावधीत प्रतापगड ते रायरेश्‍वर (जावळी अरण्यमार्गे) धारातीर्थ यात्रा मोहीम होत आहे. शुक्रवार, २६ जानेवारीला दुपारी प्रतापगडावरील आई श्री भवानीदेवीची आरती करून मोहिमेस प्रारंभ झाला. अग्रभागी टेहळणी पथक, भगवा ध्वज घेतलेले मानकरी, शस्त्रपथक आणि त्यामागे शिवरायांचा जयघोष करत मार्गक्रमण करणारे सहस्रो धारकरी असे मोहिमेचे स्वरूप आहे.

मोहिमेच्या ५ दिवसांच्या कालावधीत मुक्कामाच्या ठिकाणी इतिहासतज्ञ आणि मान्यवर वक्ते यांनी धारकर्‍यांना राष्ट्र-धर्म, तसेच इतिहास यांविषयी मार्गदर्शन केले. मोहिमेत देशभरातून आलेले ५० सहस्रांहून अधिक धारकरी सहभागी झाले आहेत. जांभळी येथील कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

क्षणचित्र

मोहिमेच्या कालावधीत पू. भिडेगुरुजींना सातारा पोलिसांकडून विशेष सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

सहस्रावधी धारकरी रायरेश्‍वराला साक्ष ठेवून शपथ घेणार !

श्री शिवप्रतिष्ठानने मागील वर्षी रायगडावर सुवर्ण सिंहासनाची स्थापन करण्याचा संकल्प केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ जेथे घेतली, त्या रायरेश्‍वराचे आशीर्वाद घेण्यासाठी संपूर्ण भारतातून धारकरी आले आहेत. आपले कार्य सिद्धीस जाण्यासाठी रायरेश्‍वराचा आशीर्वाद मिळावा, अशी प्रार्थना प्रत्येक धारकरी करणार आहे, असे पू. भिडेगुरुजी यांनी सांगितले.

आसेतु हिमाचल कोणताही स्त्री-पुरुष भेद न करता प्रत्येकाच्या अंतःकरणात, हृदयात, लहानमोठ्या मेंदूत, डाव्या-उजव्या काळजात, तांबड्या-पांढर्‍या पेशीत आणि रक्ताच्या थेंबाथेंबात शिवाजी-संभाजी हे दोन जगण्या-मरण्याचे मंत्र बिंबवणे हे क्रमांक एकचे राष्ट्रोत्थानाचे काम आहे !

– पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान

राष्ट्रात निर्मू अवघ्या शिवसूर्यजाळ !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *