साम्यवाद्यांच्या राज्यातील हिंदुद्वेषाची परिसीमा !
केरळ : अलाप्पुझा येथे असणार्या कोचीन विद्यापिठाच्या ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कुट्टनाड’मधील काही उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना कटलेटमधून जाणूनबुजून मांस (बीफ) खाऊ घातल्याचा आरोप प्राचार्य आणि महाविद्यालय कार्यकारिणी यांच्यावर केला आहे. याविषयी त्या विद्यार्थ्यांनी २७ जानेवारीला अलाप्पुझाच्या जिल्हा दंडाधिकार्यांना एक पत्र लिहून माहिती देत प्राचार्यांच्या विरोधात तक्रार केली, तसेच धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. केरळमध्ये चालू असणारी तणावाची परिस्थिती पहाता प्राचार्यांनी ‘श्री सरस्वतीदेवीची पूजा करण्यासही अनुमती दिली नाही’, अशी तक्रारही त्या विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे केली. (महाविद्यालयाची मोगलशाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
एका उत्तर भारतीय विद्यार्थ्याने सांगितले की, जेवणापूर्वी संबंधित पदाधिकार्यांना विद्यार्थ्यांनी ‘ते पदार्थ शाकाहारी आहेत का ?’, असे विचारले होते. त्या वेळी ‘हे सर्व पदार्थ शाकाहारी आहेत’, असे सांगण्यात आले होते; पण त्यानंतर मल्याळी विद्यार्थ्यांनी कटलेट खाल्ल्यानंतर त्यात ‘मांस’ असल्याचे कळले. तोपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी हे कटलेट खाल्ले होते. महाविद्यालयाच्या या कृत्यामुळे सध्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात