Menu Close

रायरेश्‍वराच्या साक्षीने धारकरी यात्रेचा समारोप !

सहस्रो धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना पू. भिडेगुरुजी

जांभळी (तालुका वाई, जिल्हा सातारा) : ३० जानेवारीला रायरेश्‍वराच्या साक्षीने, सहस्रावधी धारकरी आणि मान्यवरांच्या सहभागाने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात झाला. भल्या पहाटे बलोपासना करून समारोप कार्यक्रमाची सिद्धता चालू झाली. सूर्यनारायणाची भगव्या रंगाची उधळण आणि भगवे फेटे परिधान केलेले धारकरी यांमुळे जणू भगव्या उत्साहाला उधाण आले होते. श्री. संदीप जायगुडे आणि श्री. शंकरराव कुलकर्णी यांनी देशधर्मविषयक क्षात्रगीते गायली. प्रेरणामंत्र म्हणून कार्यक्रमास प्रारंभ झाला. यानंतर मान्यवरांचे उद्बोधक मार्गदर्शन झाले.

पू. संभाजीराव भिडेगुरुजींनी याप्रसंगी केलेले मार्गदर्शन म्हणजे क्षात्रतेज आणि ब्राह्मतेजाचा उत्तम मिलापच होता. पू. भिडेगुरुजींच्या उपस्थितीत आणि श्री रायरेश्‍वराच्या साक्षीने धारकर्‍यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली. श्री. रावसाहेब देसाई यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. मोहिमेचा समारोप ध्येयमंत्र म्हणून करण्यात आला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या धारातीर्थयात्रेचा जांभळी (जिल्हा सातारा) येथे समारोप !

सहस्रावधी धारकर्‍यांनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ !

दैनिक सनातन प्रभातच्या ‘धारातीर्थ यात्रा मोहीम विशेष’ अंकाचे प्रकाशन करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. मदन सावंत, भाजपचे आमदार श्री. सुधीर गाडगीळ, अभिनेते आणि इतिहासअभ्यासक श्री. राहुल सोलापूरकर, प्रा. मुकुंदराव दातार आणि श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे अध्यक्ष श्री. रावसाहेब देसाई

जांभळी (तालुका वाई, जिल्हा सातारा) :  श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या धारातीर्थयात्रा तथा गडकोट मोहिमेचा समारोप येथे रायरेश्‍वराच्या साक्षीने, सहस्रावधी धारकरी आणि मान्यवरांच्या सहभागाने मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात झाला. या वर्षी २६ ते ३० जानेवारी या कालावधीत प्रतापगड ते रायरेश्‍वर धारातीर्थयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. समारोपप्रसंगी सहस्रावधी धारकर्‍यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली. पू. भिडेगुरुजींचे मार्गदर्शन असल्याने हा दिवस म्हणजे धारकर्‍यांसाठी जणू पर्वणीच ठरला ! या वेळी दैनिक सनातन प्रभातच्या ‘धारातीर्थ यात्रा मोहीम विशेष’ अंकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *