Menu Close

भारतात हिंदुत्वाच्या नावाखाली आतंकवाद वाढतोय ! – ऐजाज अहमद

  • पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत ऐजाज अहमद चौधरी यांचा आरोप

  • आतंकवादाविषयी जगाचे लक्ष इतरत्र वळवण्याचा पाकिस्तानचा डाव

वॉशिंग्टन : पाकिस्तानपुरस्कृत आतंकवाद संपवण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव आणला आहे. पाकिस्तानचे अमेरिकेशी असलेले संबंध बरेच ताणल्याचे पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत ऐजाज अहमद चौधरी यांनी मान्य केले आहे. पाकिस्तानवर होणार्‍या या आरोपापासून जगाचे लक्ष इतरत्र वळवण्यासाठी पाकिस्तानने भारताकडे अंगुलीनिर्देश केला आहे. भारतात हिंदुत्वाच्या नावाखाली आतंकवाद वाढतोय, असा आरोप पाकिस्तानच्या राजदूतांनी वॉशिंग्टनमध्ये नागरिकांना संबोधित करतांना केला. भारत सध्यस्थितीचा लाभ उठवून पाकिस्तानमध्ये अस्थिरता निर्माण करू पहात आहे. भारत पाकविरोधात दुहेरी दबावतंत्राचा वापर करत आहे, असा आरोप चौधरी यांनी या वेळी केला. भारताशी चर्चा करण्यास पाकिस्तान नेहमीच इच्छुक असतो; मात्र कधी कधी भारताचे नेतृत्व त्यासाठी सिद्ध नसते, असा आरोप पाक राजदूतांनी केला. पाकिस्तानचा आरोप भारताने फेटाळून लावला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *