- पाक आणि बांगलादेशमधील अल्पसंख्य हिंदूंवर सतत अमानुष अत्याचार होत असतांना सरकार गप्प का, हे जनतेला समजले पाहिजे !
- पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंवर होणार्या आघातांविषयी मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना एक शब्दही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका : बांगलादेशमध्ये लक्ष्मीपूर जिल्ह्यातील चारगाझी येथील कारला मार्केट येथे रहाणार्या एका हिंदु विवाहितेवर २ धर्मांधांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. २३ आणि २४ जानेवारीला ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर बांगलादेशमधील ‘बांगलादेश मायनॉरीटी वॉच’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे प्रमुख अधिवक्ता रवींद्र घोष यांनी पुढाकार घेऊन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात भाग पाडले. तथापि तेथील पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही.
पीडित हिंदु महिला चारगाझी येथे एका भाड्याच्या घरात रहात होती. तिचे पती नोकरीनिमित्त ओमान देशात वास्तव्य करत आहेत, तर आई-वडील चितगाव येथे रहातात. २३ जानेवारी या दिवशी पहाटे २ वाजता महंमद बादशा आलम आणि महंमद अशरफ हे पीडितेच्या घरात बलपूर्वक घुसले आणि त्यांनी या महिलेवर बलात्कार केला, तसेच या घटनेची इतरत्र वाच्यता न करण्याची धमकी दिली. या घटनेमुळे महिलेला मोठा धक्का बसल्याने तिने ही घटना कुणाला सांगितली नाही. याचा अपलभ घेत धर्मांधांनी २४ जानेवारी या दिवशी पुन्हा त्या महिलेवर बलात्कार केला.
या घटनेची कुणकुण शेजार्यांना लागताच त्यांनी पोलिसांना कळवले; मात्र धर्मांधांच्या विरोधात कुणीही तक्रार नोंदवली नाही, असे कारण देत पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास नकार दिला.
शेवटी ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष यांना ही घटना कळल्यावर त्यांनी रामगोत्री पोलीस ठाण्याचे प्रभारी इकबाल हुसेन यांच्याशी संपर्क साधून गुन्हा नोंद करण्यास सांगितले. यानंतर पोलिसांनी २८ जानेवारीला बलात्कार्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केल्याचे सांगण्यात आले.
अधिवक्ता रवींद्र घोष यांनी लक्ष्मीपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महाताबुद्दिन यांच्याशीही संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणात चौकशी करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पीडित हिंदु महिलेच्या एका नातेवाइकाने या प्रकरणी तक्रार दिली. अधिवक्ता घोष यांनी या घटनेतील आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, पीडित महिलेला वैद्यकीय साहाय्य देण्यात यावे, तसेच तिला आर्थिक साहाय्य करण्यात यावे, आदी मागण्या सरकारकडे केल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments