यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
वणी (यवतमाळ) : येथील तहसील चौकात २७ जानेवारीला राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. देशहितासाठी ‘लोकसंख्या नियंत्रण आणि संतुलन’ कायदा करणे आवश्यक आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे श्री. लहू खामणकर यांनी मांडले. या आंदोलनासाठी २३ साधक आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. स्वाक्षरी मोहिमेत १०० जणांनी निवेदनावर स्वाक्षर्या केल्या.
देशाची अखंडता राखण्यासाठी लोकसंख्या नियत्रंण कायदा करावा, काश्मिरी हिंदूंचे तात्काळ पुनर्वसन करून त्यांना हक्काचे स्वतंत्र ‘होमलँड’ द्यावे, हिंदूंच्या सण उत्सवाच्या वेळी प्रवासी भाडेवाढ करू नये, बिहार राज्यात अल्पसंख्यांकांना सवलती देऊन इतर नागरिकांमध्ये भेदभाव करू नये, या मागण्याही आंदोलनात करण्यात आल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात