बेळगाव : येथील वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या जवळील आदर्श कॉलेजच्या मैदानात ४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. धर्मप्रेमींनी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार असल्याचे सांगितले.
१. सभेच्या निमित्ताने बेळगाव आणि आसपासच्या विविध गावांमध्ये धर्मप्रेमींच्या ५५ बैठका घेण्यात आल्या. मकरसंक्रांतीनिमित्त झालेल्या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात २६ ठिकाणी धर्मजागृती सभेचा विषय सांगून सभेला येण्याचे आवाहन करण्यात आले. होर्डिंग आणि रिक्शावरील पोस्टरच्या माध्यमातूनही प्रसार चालू आहे.
२. भाजप आणि शहरातील महिला मंडळे यांच्या वतीने आयोजित भारतमाता पूजन कार्यक्रमातून सभेचे विषय सांगून उपस्थितांना जाहीर निमंत्रण देण्यात आले.
३. सभेनिमित्त वारकरी संप्रदायाचे प.पू. वासुदेव पुरुषोत्तम गिंडे महाराज, आर्ष विद्यापिठाचे पू. चित्प्रकाशानंद सरस्वती, चिन्मय मिशनच्या पू. स्वामिनी प्रज्ञानंदाजी यांचे आशीर्वादही घेण्यात आले. पू. चित्प्रकाशानंद सरस्वती, तसेच पू. स्वामिनी प्रज्ञानंदाजी यांनी सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित रहाण्यासाठी आवाहन करून त्याचे १ मिनिटाचे चलचित्र दिले.
४. ग्रामीण भाजपचे आमदार श्री. संजय पाटील, माजी भाजप आमदार श्री. अभय पाटील, भाजपचे श्री. पांडुरंग धोत्रे, भाजपचे अधिवक्ता अनिल बेनके, शिवसेनेचे बेळगाव तालुका प्रमुख श्री. सचिन गोरले, भाजपचे श्री. धनंजय जाधव यांनाही सभेचे निमंत्रण दिले. श्री. अनिल बेनके, श्री. सचिन गोरले, श्री. धनंजय जाधव, तसेच श्री. पांडुरंग धोत्रे यांनीही सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित रहाण्याच्या आवाहनाचा १ मिनिटाचा व्हिडिओ दिला.
५. सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून प्रतिदिन १५ सहस्रांहून अधिक लोकांपर्यंत प्रसार होत आहे. फेसबूकच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात प्रसार चालू आहे.
६. धर्मजागृती सभेच्या बैठका आयोजित करण्यात, घेण्यात, तसेच विविध माध्यमांतून प्रसार करण्यासाठी बजरंग दलाचे श्री. आदिनाथ गावडे आणि त्यांचे कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषदेचे श्री. हेमंत हावळ आणि सहकारी, तसेच शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि अन्य धर्मप्रेमी यांचा उत्स्फूर्त सहभाग अन् सहकार्य लाभत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात