जळगाव : ६९ व्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील चोपडा, भुसावळ आणि कुर्हे येथे विविध उपक्रम राबवण्यात आले. यात शिववंदना ग्रुपने आणि स्वराज्य निर्माण सेना यांनीही सहभाग घेतला होता. या वेळी क्रांतिकारकांचे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते. चोपडा येथील छत्रपती शिवाजी चौकात आणि भुसावळ येथे संपूर्ण वन्दे मातरम् म्हणण्यात आले.
भुसावळ येथील क्रांतिकारकांच्या फ्लेक्स प्रदर्शनाला तेथील विद्यमान आमदार श्री. संजय सावकारे, उपनगराध्यक्ष श्री. युवराज लोणारी, शिवसेना नगरसेवक श्री. मुकेश गुंजाळ यांनी भेट दिली. संयोजक शिववंदना ग्रुपसह शिवसेनेचे विभागप्रमुख उमाकांत शर्मा यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
चोपडा येथील छत्रपती शिवाजी चौकात सकाळी ८ वाजता नगराध्यक्षा सौ. मनिषाताई चौधरी यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन अन् माल्यार्पण करण्यात आले. या वेळी संपूर्ण वन्दे मातरम् म्हणण्यात आले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ९, शिवसेनेचे ८, काँग्रेसचे ३ नगरसेवक यांच्यासह श्री. वसंत पवार, श्री. बाबा देशमुख, भाजप शहराध्यक्ष श्री. नरेंद्र पाटील, श्री. नरेश महाजन, स्वराज्य निर्माण सेनेचे श्री. सुनील सोनगीरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिल पाटील, श्री. किशोर दुसाने यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात