Menu Close

अमरावती येथे ११ फेब्रुवारीला होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचा प्रसार उत्साहात

बसगाडीवर सभेचे निमंत्रण लावण्यासाठी बसचे उत्सुक कर्मचारी

अमरावती : अमरावती शहरात संत गाडगेबाबा मंदिरासमोरील मैदान, गाडगेनगर येथे ११ फेब्रुवारीला विशाल हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन हिंदु जनजागृती समितीने केले आहे. त्याच्या प्रचार-प्रसाराला आता वेग आला असून समितीचे कार्यकर्ते आणि शहरातील धर्माभिमानी यांचा उत्साह वाढला आहे.

शिकवणीवर्ग, भजनी मंडळे, युवकांची मंडळे यांसारख्या विविध गर्दीच्या ठिकाणी सभेच्या बैठका घेणे, भागवत सप्ताह, मंदिर याठिकाणी जाऊन सभेचा विषय मांडणे, होर्डिंग लावणे, रिक्शा किंवा सिटी बस यांवर सभेचे पोस्टर लावणे, सामाजिक संकेतस्थळे या माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारकार्य चालू आहे. शहरातील मान्यवरांनाही सभेचे निमंत्रण देण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *