हिंदु धर्मात महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते, अशी तथाकथित ओरड करणारे पुरो(अधो)गामी इस्लाममधील घातक प्रथांच्या विरोधात गप्प रहातात, यातूनच त्यांचा ढोंगीपणा उघड होतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : पतीने दुसरा निकाह करून हलालासाठी दबाव आणल्याचा आरोप करत नालासोपारा येथील एका पीडित मुसलमान महिलेने याविषयी मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. यात इस्लाममधील तिहेरी तलाक, निकाह, हलाला आणि बहुपत्नीत्व या प्रथांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
वर्ष २००९ मध्ये वांद्रे येथील एका व्यक्तीशी तिचा निकाह झाल्यावर २ मासांत सासरच्या मंडळींनी तिचा छळ चालू केला. त्यानंतर वर्ष २०१२ मध्ये पतीने तिला तलाक दिला. आता तो पोटगी न देण्यासाठी शरीयत कायद्यानुसार निकाह हलाला करण्यासाठी पत्नीवर दबाव टाकत आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात