Menu Close

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथील शाळांमधील २ सहस्र ५०० विद्यार्थ्यांनी संपूर्ण कडव्यांचे वन्दे मातरम् ऐकले

हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम !

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) : येथे २६ जानेवारीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शाळांमध्ये ५ कडव्यांचे संपूर्ण वन्दे मातरम् विद्यार्थ्यांना ऐकवण्यात आले. ईश्‍वरपूर येथील सद्गुरु आश्रम शाळा, बत्तीस शिराळा, कैलासवासी पांडुरंग सखाराम पाटील शाळा, तांबवे (जिल्हा सांगली) आणि वेळवंड हायस्कूल, वेळवंड (जिल्हा रत्नागिरी) या ठिकाणी हे गीत ऐकवण्यात आले. एकूण २ सहस्र ५०० विद्यार्थ्यांनी हे गीत ऐकले. वेळवंड येथील शिक्षकांना राष्ट्रध्वजाचा मान राखा या विषयासह समितीच्या कार्याचीही माहिती देण्यात आली. त्यानंतर शिक्षकांनी वेळवंड येथे प्रजासत्ताकदिनी संपूर्ण कडव्यांचे वन्दे मातरम् विद्यार्थ्यांना ऐकवले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *