पंढरपूर : येथे २ मार्च या दिवशी होणार असलेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसारासाठी २५ फेब्रुवारीच्या रात्री ८ वाजता वाखरी येथे लहान स्वरूपातील धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी २ मार्चच्या धर्मसभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार असल्याचे सांगून तत्परतेने नियोजनही केले. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अलका व्हनमारे यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांचा सत्कार सौ. छाया आगलावे यांनी केला.
या वेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री गंगाधर गायकवाड, गणेश खंडागळे, नामदेव पिसे, पांडुरंग पिसे, शिवाजी आगलावे यांसह १०० हिंदु धर्माभिमानी सहभागी होते. सौ. शकुंतला जगताप, सतीश गोसावी, आबासाहेब धनवडे, माजी सरपंच सनातन लोखंडे, अरूण जगदाळे, अर्जुन शिंदे यांनी सभा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. सभेच्या प्रसारासाठी श्री. सतीश गोसावी यांनी १०० निमंत्रण पत्रिकाही वाटल्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात