- हिंदु तरुण अन्य पंथीय तरुणीवर प्रेम करतात, तेव्हा त्यास विरोध करण्यासाठी धर्मांध थेट कायदा हातात घेतात. धर्मांधांची ही आक्रमकता जाणा !
- राजस्थानमध्ये लव्ह जिहादच्या संशयावरून धर्मांधाची हत्या झाली असता रान उठवणारी हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे आणि पुरो(अधो)गामी आता गप्प का ?
- लव्ह जिहादला विरोध करणार्यांना ‘प्रेमाला धर्म नसतो’, असे उपदेशाचे डोस पाजणारे आता कुठे गेले ? – सम्पादक, दैनिक सनातन प्रभात
देहली : येथील रघुवीरनगरमध्ये धर्मांधांनी अंकित सक्सेना या छायाचित्रकाराची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केली. २३ वर्षीय अंकितचे २० वर्षांच्या अन्य मुस्लिम पंथीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून तरुणीच्या नातेवाइकांनी हे कृत्य केले. याप्रकरणी पोलिसांनी तरुणीचे आई-वडील आणि तिचा काका यांना अटक केली आहे. तिघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, तर १६ वर्षाच्या भावाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
२. १ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता अंकित कामावरून घरी परत येत होता. त्या वेळी तरुणीच्या नातेवाइकांनी त्याला मार्गात गाठले आणि त्यांच्या मुलीपासून लांब रहाण्याची त्याला धमकी दिली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला.
३. त्यानंतर तरुणीच्या नातेवाइकांनी अंकितला मारहाण केली. तरुणीच्या वडिलांनी धारदार शस्त्राने अंकितचा गळा चिरला आणि पळून गेले. यात अंकितला वाचवण्यासाठी आलेले सक्सेना कुटुंबातील सदस्यही घायाळ झाले. तरुणीने स्वत: आरोपींच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली.
४. या घटनेनंतर सक्सेना यांच्या घराजवळ मोठ्या संख्येने लोक गोळा झाले. काही लोकांनी मुलीच्या काकांना पकडून चोप दिला; मात्र तिचे आई-वडिल आणि भाऊ पळून गेले.
५. घटनेच्या दुसर्या दिवशी पोलिसांनी मृतक अंकीतच्या घराजवळ एक कमान्डो युनिट आणि २४ हून अधिक पोलिसांचा पहारा ठेवला आहे.
६. अंकितला भेटायला तरुणीचे वडील सुरा घेऊन आले होते, तसेच ज्या ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ छायाचित्रक नव्हते, अशा ठिकाणी नेऊन अंकितची हत्या करण्यात आली. त्यामुळे ही हत्या सुनियोजित होती, असा आरोप अंकितच्या नातेवाइकांनी केला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात