Menu Close

कल्याण येथे विश्‍व हिंदु परिषदेच्या पदाधिकार्‍याची धर्मांधांकडून हत्या

  • दादरी (उत्तरप्रदेश) येथील हत्याकांडानंतर ऊर बडवणारे आणि सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवणारे पुरो(अधो)गामी, तसेच ‘पुरस्कार वापसी’वाली टोळी आता गप्प का ? आता साम्यवाद्यांचे मेणबत्ती मोर्चे का निघत नाहीत ?
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या होणे, हे हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि सरकार यांना लज्जास्पद ! केंद्रातील भाजप सरकारने केरळ, प. बंगाल येथील हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या वेळीच रोखल्या असत्या, तर आज ही स्थिती निर्माण झाली नसती. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

कल्याण : येथील पूर्वेतील आनंदवाडी परिसरात रहाणारे विश्‍व हिंदु परिषदेचे शाखा संयोजक अशोक मालुसरे (वय ३२ वर्षे) यांच्यावर १ फेब्रुवारीच्या रात्री धर्मांधांनी धारधार शस्त्रांनी आक्रमण केले. त्यात गंभीररित्या घायाळ झालेले मालुसरे यांचा २ फेब्रुवारी या दिवशी मृत्यू झाला. रात्री कामाहून घरी परतत असतांना धर्मांधांनी धारदार शस्त्राने त्यांना भोसकल्यावर घायाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. अशोक मालुसरे भाजपच्या कार्यातही सक्रीय होते.

अनधिकृत मशिदीचे काम बंद पाडल्याच्या रागातून हत्या केल्याचा संशय !

आनंदवाडी परिसरात काही मासांपूर्वी एका अनधिकृत मशिदीचे बांधकाम बंद पाडण्यासाठी अशोक मालुसरे यांनी अर्ज दिला होता. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने त्या मशिदीचे काम बंद पाडले होते. याच रागातून सराईत गुन्हेगार असलेल्या धर्मांध तस्लिम शेख याने आपल्या साथीदारांच्या साहाय्याने संगनमत करून अशोक मालुसरे यांची हत्या घडवून आणली असल्याचा आरोप हिंदुत्वनिष्ठ करीत आहेत.

गुन्हेगार पसार दाखवले; मात्र ते मोकाट फिरत असल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट

मारहाण झाल्यानंतर त्यांचे वडील लक्ष्मण मालुसरे यांना कोळसेवाडी पोलीस ठाण्यात २ फेब्रुवारीला तक्रार प्रविष्ट केली. असे असूनही आरोपींना कह्यात घेण्यात आलेले नाही, असे समजते. पोलिसांच्या लेखी धर्मांध तस्लिम शेख पसार असल्याची नोंद होती. आनंदवाडी परिसरातील हिंदुत्वनिष्ठांनी धर्मांध तस्लिम शेख आणि त्याचे साथीदार यांना त्या परिसरात फिरतांना पाहिले.

मृतदेहाचे दर्शन घेण्यासाठी जमलेल्या हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी हुसकावले !
(एखाद्या धर्मांधाच्या संदर्भात पोलिसांनी अशी कृती केली असती का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रण पाहिल्यास ते स्पष्ट होते. हिंदुत्वनिष्ठांच्या दबावानंतर पोलिसांनी उशिराने एका आरोपीस कह्यात घेतले आहे. मालुसरे यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कल्याण पश्‍चिमेतील रुक्मिणीबाई रुग्णालयात आणण्यात आला. त्या वेळी मोठ्या संख्येने हिंदुत्वनिष्ठ जमले होते. जमलेल्या हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी दमदाटीने हुसकावून लावले. पोलीस उपायुक्त श्री. संजय शिंदे यांनी हिंदूंना शांत रहाण्याचे आवाहन केले.

आक्रमण करणारे सराईत गुन्हेगार  असूनही पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक का केली नाही ? – पराग तेली, जिल्हा धर्मप्रसार आणि संपर्क प्रमुख, विश्‍व हिंदु परिषद

अशोक मालुसरेंच्या हत्येला निष्क्रीय पोलीस उत्तरदायी आहेत. आरोपी सराईत गुन्हेगार आहे. परिसरात त्याची दहशत असून दिवसाढवळ्या फिरतो; परंतु पोलिसांना सापडत नाही, हे कसे शक्य आहे ? म्हणजे पोलिसांचे त्याला पाठबळ असल्याचे सिद्ध होते. आक्रमण करणारे सराईत गुन्हेगार असूनही पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक का केली नाही ? कर्तव्यचुकार अधिकार्‍यांवरही कारवाई झाली पाहिजे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *