अशा शाळांमधून आदर्श नागरिक नव्हे, तर आतंकवादी निर्माण झाल्यास आश्चर्य वाटणार नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बिजनौर (उत्तरप्रदेश) : बिजनौर जिल्ह्यातील एका शाळेच्या अभ्यासक्रमात वादग्रस्त मुसलमान धर्मगुरु डॉ. झाकिर नाईक यांना मुसलमानांचे नायक म्हणून शिकवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी अलीगड येथील एका इस्लामिक शाळेतही डॉ. नाईक यांना नायकाच्या रूपात शिकवण्यात येत असल्याची घटना समोर आली होती.
धाकी या गावात शासकीय मान्यता असणार्या एका खासगी शाळेच्या अभ्यासक्रमात डॉ. झाकिर नाईक यांच्यावर आधारित पुस्तक शिकवण्यात येत असल्याची माहिती बिजनौर येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश चंद्रा यांना मिळाली.
त्यानंतर चंद्रा यांनी तालुका शिक्षणाधिकारी शिवकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली एक चमू धाकी गावात पाठवला. तेथे दुसर्या वर्गाच्या मुलांना इल्म-उन-नफे नावाचे पुस्तक शिकवण्यात येत असून या पुस्तकात डॉ. नाईक यांच्यावर धडा असल्याचे या चमूच्या लक्षात आले. या पुस्तकात हिरोज ऑफ इस्लाम (इस्लामचे नायक) असा उल्लेख होता. या पुस्तकात डॉ. नाईक यांना नायकाच्या रूपात दाखवण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात