केंद्रातील मोदी शासन नवाज शरीफ शासनाप्रमाणे कारवाई करण्याचे धाडस दाखवणार का ?
- चिथावणीखोर भाषणे देणार्या मशिदींवरील कारवाईत १० सहस्र जणांना अटक
- तर २ सहस्र ६६४ ध्वनीक्षेपक जप्त
इस्लामाबाद : आतंकवाद्यांच्या विरोधातील कारवाईच्या अंतर्गत पाकिस्तानी अधिकार्यांनी देशभरातील संशयित आणि नोंदणी न झालेले असे २५४ मदरसे बंद केले आहेत. मशिदींवरील ध्वनीक्षेपकाद्वारे भडकवणारी भाषणे देण्याच्या प्रकरणी ९ सहस्र ९४५ गुन्हे दाखल करण्यात आले असून या प्रकरणी १० सहस्र १७७ जणांना अटक करण्यात आली आहे. यात २ सहस्र ६६४ ध्वनीक्षेपक जप्त करण्यात आले आहेत. ही माहिती राज्यमंत्री बलिगुर रहमान यांनी संसदेत दिली.
१. रहमान यांनी सांगितले की, आक्षेपार्ह भाषण करण्याच्या संदर्भात आतापर्यंत २ सहस्र ४७१ प्रकरणे प्रविष्ट करण्यात आली आहेत, तर जिहाद्यांना साहाय्य करणार्या ७३ व्यावसायिक आस्थापनांना बंद करण्यात आले आहे.
२. सिंध प्रांतातील १६७, खैबर पख्तुन्ख्वातील १३ आणि पंजाबमधील २ संशयित मदरसे, तसेच सिंधमधील नोंदणी न करण्यात आलेले ७२ मदरसे बंद करण्यात आले आहेत.
३. प्रत्येक मदरशाची चौकशी केली जात आहे. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. इस्लामाबाद आणि पंजाब येथील सर्व मदरशांची पडताळणी पूर्ण झाली आहे, तर सिंधमधील ८० प्रतिशत पडताळणी झाली आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये ७५ आणि बलुचिस्तानमध्ये ६० प्रतिशत पडताळणी पूर्ण झाली आहे.
४. पाकमध्ये १९० विदेशी मदरसे चालवण्यात येतात. यातील १४७ मदरसे केवळ पंजाब प्रांतात आहेत.
५. आक्षेपार्ह साहित्य वितरित करण्याच्या संदर्भात लवकरच एक नवीन कायदा आणण्यात येणार आहे. तसेच शाळांतील अभ्यासक्रमातून आक्षेपार्ह साहित्य काढण्यात येईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात