चोपडा : येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी चौकात हिंदु जनजागृती समिती आणि स्वराज्य निर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड ‘वन्दे मातरम्’ चे गायन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आरंभी नगराध्यक्षा मनिषाताई चौधरी यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले.
या वेळी उपनगराध्यक्षा सीमा श्रावगी, गटनेते, ७ नगरसेवक, शिवसेनेचे गटनेते शिवसेनेचे १७ नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक प्रकाश राजपूत, बापू चौधरी, ३ सामाजिक कार्यकर्ते, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र पाटील, स्वराज्य निर्माण सेनेचे सुनील सोनगीरे आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात