Menu Close

सोलापूर येथे सभेच्या प्रसारबैठकांना चांगला प्रतिसाद

(डावीकडे) सोलापूरचे खासदार अधिवक्ता शरद बनसोडे यांना सभेचे निमंत्रण देतांना समितीचे कार्यकर्ते

१. अक्कलकोट रोड, सूत मिलमागील किसाननगर येथील हनुमान मंदिरात धर्मसभेच्या प्रसारासाठी घेण्यात आलेल्या बैठकीला ८० धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी सभेनंतर महिलांसाठी बैठक घेण्याची मागणी करण्यात आली.

गवळी वस्ती, तालीम संघ येथे विषय मांडतांना श्री. सुरेश शिंदे आणि उपस्थित धर्मप्रेमी

२. गवळी वस्ती, तालीम संघ येथे शिवजयंतीच्या नियोजन बैठकीत सभेचा विषय मांडण्यात आला. श्री. सुरेश शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांची आरती करण्यात आली, तसेच श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी ६० युवक उपस्थित होते.

गवळीवस्ती येथील भाजपच्या नगरसेविका वरलक्ष्मी पुरुड यांनी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित युवक आणि महिला

३. बाळी वेस येथे श्रीसंप्रदाय सत्संगात सभेचा विषय मांडण्यात आला. या वेळी ८० महिला आणि पुरुष उपस्थित होते.

४. भुलाभाई चौकातील श्रीकृष्ण मंदिर येथे २० धर्मप्रेमींची बैठक पार पडली.

५. पद्मशाली पुरोहित संघात विषय मांडण्यात आला.

६. कुमठा नाका, नई जिंदगी येथे लोधी समाजाची बैठक पार पडली. या वेळी ३८ धर्मप्रेमी उपस्थित होते.

७. ‘डब्ल्यूआयटी’ महाविद्यालयाजवळील श्रीकृष्ण मंदिर येथे ३५ युवकांची बैठक घेण्यात आली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *