पाकिस्तानमधील हिंदुद्वेष !
खरेतर बहुसंख्यांक हिंदूंच्या भारत देशातील सरकारने अन्य देशांतील हिंदूंच्या रक्षणासाठी नैसर्गिकरित्या कार्य करायला हवे होते; परंतु निधर्मी भारतातील राज्यकर्ते हेे कधीच करणार नाहीत. त्यामुळे आता देशभरातील हिंदु संघटनांनीच संघटित होऊन यासाठी कार्य करणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मिथी : पाकिस्तानच्या थारपरकार जिल्ह्यातील हिंदुबहुल मिथी शहरात दिलीप कुमार आणि चंद्र कुमार या दोन हिंदु बंधूंची धर्मांधांनी नुकतीच दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या केली. त्यामुळे या शहरात हिंदूंमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. या शहरात हिंदूंच्या हत्या करणे, धर्मांतर घडवून आणणे आणि त्यांना पळून जाण्यास भाग पाडणे इत्यादी प्रकारांत सध्या वाढ झाली आहे. ‘जमात-उद्-दवा’ या आतंकवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईद याचा यामध्ये हात असल्याचा संशय आहे. मिथी शहरातील मेघवाल हा गरीब हिंदु समुदाय धर्मांधांच्या अत्याचाराचा बळी ठरला आहे. येथे हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर घडवले जाते. हिंदु मुलींना पळवून नेऊन त्यांचे मुसलमान तरुणांशी विवाह लावून दिले जातात. काही वर्षांपूर्वी या शहरातील हिंदूंची लोकसंख्या ८० टक्के होती. ती आता ६० टक्क्यांवर आली आहे. बरेच जण पळून भारतात आले आहेत, तर काहींनी नाईलाजाने इस्लाम धर्म स्वीकारला आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानात हिंदूंवर होणार्या अत्याचाराचा मुद्दा प्राधान्यक्रमाने हाताळणार असल्याचे आश्वासन अनेक वेळा दिले आहे. मिथीप्रकरणी स्वराज यांनी हस्तक्षेप केला नाही, तर हिंदुबहुल मिथी शहर मुसलमानबहुल बनणार, यात तिळमात्र शंका नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात