मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम जाणा ! उद्या प्रशासनाने गर्दीच्या नावाखाली देवीच्या दर्शनावरच निर्बंध घातल्यास आश्चर्य वाटणार नाही ! ही स्थिती पालटण्यासाठी मंदिरे शासनाच्या कह्यातून भक्तांच्या कह्यात देण्याला पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
तुळजापूर : येथील श्री भवानीदेवीच्या मंदिरात धार्मिक विधीनंतर ओल्या कुंकवात हात (पंजा) बुडवून त्याचे ठसे (छाप) भाविकांच्या कपड्यावर उमटवण्याची पारंपरिक प्रथा बंद करण्यात आली असून मंदिर प्रशासनाच्या आदेशाने याची कार्यवाही चालू केली आहे. ठसे उमटवण्यासाठी कसलेही शुल्क घेतले जात नाही, तसेच कोणाची याविषयी तक्रारही नाही. असे असतांना ही प्रथा बंद करण्यात आली आहे. ठसे उमटवण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे कारण पुढे करत हा निर्णय घेण्यात आला आहे.
श्री भवानीदेवीचे दर्शन घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज द्वाराजवळ ओल्या हळद-कुंकवात पंजे बुडवून ठसे उमटवण्याची पारंपरिक पद्धत आहे. या वेळी ‘श्री भवानीदेवीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे’, अशी भक्तांची श्रद्धा आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थांचे धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांनी प्रथा बंद केल्याच्या निर्णयाला दुजोरा दिला आहे. यापूर्वीही मंदिरामध्ये पुरातत्व विभागाच्या अनुमतीविना अनेक पालट केले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात