Menu Close

कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्यांत हिंदु धर्मजागृती सभा आयोजित करा ! – श्री. अमरसिंह पाटील, अध्यक्ष, आदर्श विद्यामंदिर शिक्षण संस्था, बेळगाव

असे संस्थाचालक सर्वत्र हवेत !

बेळगाव : आदर्श विद्यामंदिर शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष श्री. अमरसिंह पाटील (माजी खासदार) यांनी ४ फेब्रुवारी या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा झाल्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधीर हेरेकर आणि सनातन संस्थेचे श्री. आबासाहेब (बापू) सावंत यांना ५ फेब्रुवारी या दिवशी भेटण्यासाठी बोलावले. भेटीप्रसंगी श्री. अमरसिंह पाटील यांनी सभेच्या आयोजन-नियोजनाचे कौतुक करून त्यांच्या शिक्षण संस्थेच्या कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्यात असणार्‍या शाळांची नावे सांगून त्याठिकाणी अशा सभा आयोजित करा. त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य करण्यास ते सिद्ध आहेत. विशेषकरून रायबाग येथे अशी सभा घेण्याविषयी सूचना देऊन त्याचे सर्व दायित्व घेऊ, असेही त्यांनी सांगितले. वर्ष २०१६ मध्ये झालेल्या सभेसाठीही श्री. पाटील यांनी सर्व सहकार्य केले होते. (हिंदु धर्मजागृती सभा त्यांच्या शिक्षण  संस्थेत आयोजित करण्याची मागणी करणारे श्री. अमरसिंह पाटील यांचे अभिनंदन ! श्री. पाटील यांच्याकडून प्रेरणा घेऊन अन्यत्रच्या शिक्षण संस्थाचालकांनी धर्मकार्य करण्यात पुढाकार घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी तेथे उपस्थित असणारे सौंदती तालुक्याचे माजी आमदार श्री. शिवानंद कौजलगी यांनीही अशीच सभा आयोजित करण्याची मागणी केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *