वैप्पिन (केरळ) : येथील एर्नाकुलम् जिल्ह्यातील न्यारक्कल भागातील एका मंदिरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कु. अदिती सुखटणकर यांनी धर्माचरण या विषयावर २५ भाविकांना मार्गदर्शन केले. कु. अदिती यांनी मार्गदर्शन करतांना समाज आणि हिंदु धर्म यांची खालावलेली स्थिती अन् त्यावर उपाय म्हणजे धर्माचरण, याविषयी महत्त्व विशद केले. या वेळी त्यांनी महिला आणि पुरुष यांनी कुंकू लावण्यामागील शास्त्र !, मंदिरांमध्ये गेल्यावर शास्त्रानुसार दर्शन कसे घ्यावे ? अन् कुलदेवतेच्या नामजपाचे शास्त्र यांविषयीही मार्गदर्शन केले.
क्षणचित्रे
१. उपस्थित जिज्ञासूंनी प्रश्न विचारल्याने चर्चात्मकरित्या विषय मांडता आला.
२. प्रवचनाच्या ठिकाणी सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला.
३. उपस्थित सर्वांनीच प्रत्येक मासाला प्रवचन आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केरळ येथे प्रवचनाच्या माध्यमातून धर्मप्रसार !
५.१.२०१८ या दिवशी एर्नाकुलम् जिल्ह्यातील कडवंत्रा येथील मट्टलिल भगवती मंदिरात प्रवचन करण्यात आले. प्रवचनात प्रार्थनेचे महत्त्व, देवाला नमस्कार कसा करावा ? इत्यादी विषय घेण्यात आले. – कु. प्रणिता सुखटणकर, केरळ (१२.१.२०१८)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात