चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांचे एका इंग्रज अधिकार्याशी प्रेमसंबंध असल्याचे चित्रण केल्याचा आरोप
सातत्याने चित्रपटांच्या माध्यमातून इतिहासाचे होणारे विकृतीकरण रोखण्यासाठी केंद्रशासनाने कायदा बनवावा, ही इतिहासप्रेमींची अपेक्षा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
जयपूर (राजस्थान) : आगामी ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांची चुकीची प्रतिमा रंगवल्याचा आरोप करत राजस्थानमधील ब्राह्मण महासभेने चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. ‘मणिकर्णिका’मध्ये अभिनेत्री कंगना राणावत या ‘राणी लक्ष्मीबाई’ची भूमिका साकारत आहेत.
याविषयी ब्राह्मण महासभेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मिश्रा म्हणाले की,
१.
२. त्या पुस्तकातील आक्षेपार्ह लिखाणामुळे त्यावर उत्तरप्रदेशात बंदी घालण्यात आली होती. असे असतांना त्या वादग्रस्त पुस्तकाचा आधार घेऊन चित्रपट का सिद्ध केला जात आहे ?
३. राणी लक्ष्मीबाई ब्राह्मण होत्या. त्यामुळे हा ब्राह्मण समाजाच्या भावनांचा प्रश्न आहे.
४. चित्रपटातील काही दृश्ये आणि गाणी यांवर आक्षेप असून त्यासाठी निर्मात्यांना पत्रही पाठवले आहे; परंतु या पत्राची नोंदही घेतलेली नाही. आमच्या पत्राची नोंद घेऊन योग्य स्पष्टीकरण दिले नाही, तर सध्या राजस्थानात चालू असलेले चित्रीकरण बंद पाडण्याची चेतावणीही त्यांनी या वेळी दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात