मंदिरातील पुजार्यांनी धर्मशिक्षण घेऊन हिंदूंना धर्मशिक्षित करणे आवश्यक असतांना स्वत: धर्माप्रती अज्ञानी राहून हिंदूंनाही चुकीचा मार्ग दाखवणारे असे पुजारी पापाचे धनी आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नागपट्टीनम् (तमिळनाडू) : मायिलादुथूराई येथील १ सहस्र प्राचीन मायुरानाथर मंदिरातील मुख्य देवता अबयाम्बीगाई देवतेला तेथील २ पुजार्यांनी सलवार-कमीज नेसवून शृंगार केला. त्यामुळे त्यांना मंदिर व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले.
या मंदिरातील देवतेला प्रत्येक शुक्रवारी रंगीत कागदाने मढवून तिचा शृंगार करण्याची प्रथा आहे; मात्र काही दिवसांपूर्वी राज नावाच्या पुजार्याने देवीला गुलाबी सलवार-कमीज आणि निळा दुपट्टा नेसवला. राज हा या मंदिरातील मुख्य पुजार्यांचा मुलगा आहे. वडील वयोवृद्ध झाल्याने त्यांच्या साहाय्यासाठी राजची मंदिराचा पुजारी म्हणून गेल्या ऑगस्ट मासात नेमणूक करण्यात आली. अशा स्वरूपातील देवतेचे छायाचित्र राज यानेच सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित केले होते. देवतेला सलवार-कमीज वेशात बघून भाविकांनी तीव्र विरोध केला, तसेच त्यांनी या विरोधात मंदिर व्यवस्थापनाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर व्यवस्थापनाने राजसह त्याच्या समवेत असणार्या पुजार्यालाही कामावरून काढून टाकले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात