Menu Close

रशियात हिंदु धार्मिक नेत्याचा धर्मांध ख्रिस्ती नेत्याकडून छळ

विदेशात हिंदु धर्माचा प्रचार करणार्‍यांना छळ सोसावा लागतो, तर भारतात अन्य धर्म प्रचारकांना पायघड्या घातल्या जातात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

हिंदु धार्मिक नेते श्री प्रकाशजी

मॉस्को (रशिया) : येथे वर्ष १९९० पासून रहात असलेल्या श्री. प्रकाश या हिंदु धार्मिक नेत्याचा तेथील ख्रिस्ती चर्चचा धर्मांध पदाधिकारी अलेक्झांडर डोरकीन याच्याकडून मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत असून त्याला कुटुंबासह रशियातून निघून जाण्यासाठी धमक्या देण्यात येत आहेत. अलेक्झांडर डोरकीन हा रशियन शासनातील धार्मिक व्यवहार समितीचा अध्यक्ष आहे. त्याला श्री. प्रकाश यांचा छळ करण्यासाठी तेथील पोलिसांचेही साहाय्य मिळत आहे.

अलेक्झांडर डोरकीन

१. श्री. प्रकाश हे आधी वैद्यकीय शिक्षणासाठी भारतातून रशियात गेले होते. नंतर ते अध्यात्माकडे वळले आणि त्यांनी रशियातील जिज्ञासूंना मार्गदर्शन करणे चालू केले. श्री. प्रकाश यांना १८ ते २३ वयोगटातील ३ मुले असून ती रशियातच शिक्षण घेत आहेत. त्यांना रशियातील अनेक नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत गेला, तसेच रशियातील भारतीय हे सुद्धा श्री. प्रकाश यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असत.

२. हे अलेक्झांडर डोरकीन यांना आवडत नव्हते. त्यांनी एका सेवाभावी संस्थेच्या साहाय्याने श्री. प्रकाश यांच्या विरुद्ध सामाजिक प्रसारमाध्यमे आणि इतर माध्यमांतून अपप्रचार चालू केला. श्री. प्रकाश हे त्यांच्या अनुयायांकडून पैसे घेतात, त्यांच्याकडे येणार्‍या महिलांना त्यांच्या पतींविरुद्ध भडकावतात, असा अपप्रचार केला. पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली, मात्र पोलिसांना श्री. प्रकाश यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासारखी काहीच सामुग्री मिळाली नाही.

३. तरीही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास देण्याचे प्रकार चालूच आहेत. श्री. प्रकाश हे रशियात आयोजित करण्यात येणार्‍या अनेक धार्मिक संमेलनांत हिंदु धर्माचे नेतृत्वही करतात.

४. जगात विशेषत: युरोपमध्ये योगाचा आणि हिंदु धर्माचा प्रसार होत आहे. रशियाही याला अपवाद नाही. अनेक ख्रिस्ती धर्मीय त्यांच्या धर्माला कंटाळून अंतिम सत्याचा शोध घेत आहेत. त्यांना हिंदु धर्माविषयी आस्था आहे. हे सर्व पाहून अलेक्झांडर डोरकीन अस्वस्थ झाले आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *