Menu Close

भ्रष्टाचाराच्या प्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया यांना ५ वर्षांच्या कारागृहवासाची शिक्षा

भारतात किती भ्रष्ट उच्चपदस्थ लोकप्रतिनिधींना अशी शिक्षा होते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

ढाका : अनाथांच्या ट्रस्टला मिळणार्‍या विदेशी निधीत भ्रष्टाचार केल्याच्या प्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान तथा ‘बांगलादेश राष्ट्रवादी पक्षा’च्या प्रमुख बेगम खलिदा झिया (वय ७२ वर्षे) यांना ढाक्यातील न्यायालयाने ५ वर्षांच्या कारागृहवासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात झिया यांचा मुलगा तारिक रहमान, तसेच अन्य चौघांना १० वर्षांसाठी कारागृहवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. झिया या २ वेळा बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. झिया सत्तेत असतांना वर्ष २००१ ते २००६ या कालावधीत त्यांनी ‘झिया चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था केवळ कागदोपत्री दाखवून या ट्रस्टच्या नावाने २ लाख ५२ सहस्र अमेरिकन डॉलरर्स इतका निधी लाटला होता. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर झिया यांच्या समर्थकांनी न्यायालयाच्या परिसरात धुडघूस घातला, तसेच त्यांनी २ मोटारसायकलीही पेटवून दिल्या. यात ५ पोलीस कर्मचारी घायाळ झाले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *