Menu Close

व्हर्टेक्स अ‍ॅग्रो आस्थापनाच्या पडताळणीत गोमांस आढळले !

संचालकांच्या विरोधात गुन्हा

राज्यात गोवंश हत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास शासनाला काय अडचण आहे ? शासनाने इच्छाशक्ती दाखवली, तर राज्यातील गोवंशियांच्या हत्या बंद होतील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नवी मुंबई : पावणे येथील ‘अ‍ॅग्रो फ्रेश कोल्ड स्टोअरेज’मध्येे गोमांस साठवल्या प्रकरणी व्हर्टेक्स अ‍ॅग्रो कंपनीचे संचालक हेमंत कुमार यांच्या विरोधात शासनाची फसवणूक, तसेच महाराष्ट्र प्राणीरक्षण कायद्यानुसार तुर्भे एम्आयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

म्हशीचे मांस असल्याची बनावट कागदपत्रे सिद्ध करून या ठिकाणी गोमांस साठववल्याची तक्रार केल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. साठवलेल्या सुमारे ७० सहस्र किलो मांसापैकी २४ सहस्र किलो गोमांस असल्याचे तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणी विश्‍व हिंदू परिषदेचे सुरेश गायकवाड यांना या संदर्भात माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तुर्भे एम्आयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी पालिकेचे पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंजारे यांच्या उपस्थितीत तिथे धाड टाकली. या वेळी स्टोरेजचे मॅनेजर उस्मान काडीवाल आणि सुपरवायझर महमद शाह यांनी कोल्ड स्टोरेजमध्ये सुमारे ७० सहस्र किलो वजनाचे ५० लाखांहून अधिक किमतीचे म्हशीचे मांस कागदपत्रेही सादर केली होती; परंतु हे मांस गायीचे असल्याच्या संशयावरून प्रत्येक बॉक्समधील मांसाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला यामध्ये तीनपैकी एक नमुना गायीच्या मांसाचा असल्याचे उघड झाले. त्यानुसार २४ सहस्र ६० किलो मांस गायीचे असल्याचे उघड झाले आहे. बाजारभावानुसार त्याची किंमत २२ लाख ८७ सहस्र रुपये आहे. म्हशीच्या मांसाचे लेबल लावून हे गोमांस अ‍ॅग्रो फ्रेश कोल्ड स्टोअरेजमध्ये साठवण्यात आले होते. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आली नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *