Menu Close

सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेला १५ सहस्रांहून अधिक हिंदूंचा हुंकार !

तीव्र विरोधानंतरही न भूतो न भविष्यति झालेल्या सभेत हिंदु राष्ट्रासाठी धर्मप्रेमी एकवटले !

जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्, झाला हिंदूंचा मूलमंत्र ।
आपुले राष्ट्र मिळवण्या संघटित होणे हेच आहे तंत्र ॥

हिंदु धर्मजागृती सभेला उपस्थित सहस्रोंचा जनसागर आणि श्री. टी. राजासिंह (पाठमोरे)

सोलापूर : श्री सिद्धेश्‍वराची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूरला ७ फेब्रुवारीला झालेली हिंदु जनजागृती समितीची हिंदु धर्मजागृती सभा वैशिष्ट्यपूर्ण ठरली. पोलीस आणि काही तथाकथित हिंदुत्वनिष्ठांच्या विविध प्रकारच्या विरोधांचा सामना करत हिंदुत्वनिष्ठांनी भगवंताच्या अधिष्ठानाच्या बळावर सभा यशस्वी करून त्यांना चपराक दिली. त्यामुळे सामर्थ्य आहे चळवळींचे, जो जो करील तयाचें, परंतु तेथे भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे । या वचनाचा प्रत्यय पुन्हा सर्वांना आला. सोलापूरला आजवर झालेल्या धर्मजागृती सभांच्या उपस्थितीपेक्षा सर्वाधिक १५ सहस्रांहून अधिक धर्मप्रेमी शेकडो किलोमीटर अंतरावरून येऊन सभेत सहभागी झाले. सभेत बोलतांना आमदार श्री. टी. राजासिंह यांनी सांगितले की, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यामुळे मी घडलो. त्यामुळे अधिकाधिक हिंदूंनी त्यांच्या कार्यात सहभागी व्हावे.

सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेला तीव्र विरोध होऊनही सभा यशस्वी करणारे साधक आणि कार्यकर्ते यांचे अभिनंदन !

सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेला १५ सहस्रांहून अधिक हिंदू उपस्थित असणे, हे हिंदु जनजागृती समितीविषयी हिंदूंच्या मनात विश्‍वास वाढत असल्याचे द्योतक आहे. आताचा काळ हिंदूंमध्ये जागृती करण्यासाठी पूरक आहे. सोलापूर येथे सभेला काही संघटना आणि पोलीस यांचा तीव्र विरोध होऊनही समितीचे कार्यकर्ते अन् सनातनचे साधक यांनी हिंदु धर्मजागृती सभा यशस्वी होण्यासाठी वैध मार्गाने तळमळीने प्रयत्न केले. त्यामुळे सभेला हिंदूंचा मोठा प्रतिसाद लाभला. यासाठी सर्व कार्यकर्ते आणि साधक यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सर्वत्रचे साधक आणि कार्यकर्ते यांनी हा आदर्श घ्यावा.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *