Menu Close

‘पॅडमन’ चित्रपट पाकिस्तानी संस्कृतीच्या विरोधात असल्याने त्यावर पाकिस्तानमध्ये बंदी !

पाकिस्तानमधील चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचा निर्णय

जगभरातील देश स्वतःची संस्कृती जपतात ! याउलट भारतात मात्र ‘पुरो(अधो)गामित्वा’च्या नावाखाली तिच्या पदोपदी चिंधड्या उडवल्या जातात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

इस्लामाबाद – अभिनेता अक्षय कुमार यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘पॅडमन’ हा चित्रपट पाकिस्तानी संस्कृतीच्या विरोधात आहे. त्यामुळे आम्ही पाकमध्ये त्या चित्रपटावर बंदी घालत आहोत, अशी घोषणा पाकिस्तानमधील चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने केली. त्यामुळे हा चित्रपट पाकमध्ये दाखवला जाणार नाही.

परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य इश्‍न अहमद म्हणाले, ‘‘महिलांच्या मासिक पाळीवर आधारित असलेला ‘पॅडमन’ चित्रपट पाकिस्तानी प्रांत, येथील संस्कृती आणि परंपरा यांच्या विरोधात आहे.’’ पाकमधील पंजाब चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने ‘आमचा धर्म आणि समाज यांच्या परंपरांच्या विरोधात असणार्‍या चित्रपटाला आम्ही कदापि अनुमती देणार नाही’, असे सांगितले. तसेच पाकमधील निर्माते सैय्यद नूर म्हणाले की, अन्य देशांतून आलेल्या चित्रपटांचे समीक्षण करणे आवश्यक आहे. ‘पद्मावत’ हा चित्रपटही दाखवण्यायोग्य नव्हता; कारण त्यात मुसलमानांची प्रतिमा मलीन करण्यात आली आहे.’’ (हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची प्रतिमा जागोजागी मलीन होत असतांना भारतातील किती हिंदु निर्माते अशी भूमिका घेतात ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *