Menu Close

बोईसर येथील हिंदु धर्मजागृती सभेला स्थानिकांचे उत्स्फूर्त सहकार्य !

बोईसर (जिल्हा पालघर) : येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने हिंदु धर्मजागृती सभा उत्साहात पार पडली. सनातनच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत आणि समितीचे प्रवक्ता श्री. सतीश कोचरेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

हिंदु राष्ट्र उभारणीसाठी कठोर धर्मपालनच आवश्यक ! – सौ. नयना भगत, सनातन संस्था

सौ. नयना भगत

इंग्रजांच्या फोडा आणि झोडा या नीतीचा परिणाम आजही भारतात होत आहे. धर्मशिक्षणाअभावी हिंदु धर्माचीही अपकीर्ती होते. हिंदु धर्म टिकवणे आणि हिंदु राष्ट्र उभारणे यांसाठी कठोर धर्मपालन, धर्माभिमान, राष्ट्रभक्ती यांविना पर्याय नाही. त्यासाठी आजपासूनच सर्वांनीच धर्माचरण करण्याचा निश्‍चय करूया.

या वेळी श्री. सतीश कोचरेकर यांनीही मार्गदर्शन केले.

क्षणचित्रे

१. सभास्थळी उपस्थित पोलिसांनी वक्त्यांचे भाषण लिहून घेतले.

२. सभागृहाच्या विश्‍वस्तांनी वक्त्यांच्या हस्ते आरती करण्यासाठी मंदिरातील आरतीच्या वेळेत पालट केला. सभेनंतर वक्त्यांच्या  हस्ते आरती करण्यात आली.

३. श्री संप्रदायाचे श्री. संतोष बारस्कर, श्री. दिलीप शिर्के, श्री. राजा कीर्तने, श्री. हरिओम पांडे या धर्मप्रेमींनी सभेत सक्रिय सहभाग घेतला.

उपस्थित मान्यवर

दत्तमंदिराचे विश्‍वस्त श्री. संजय नारखेडे, मनसेचे पालघर शहराध्यक्ष श्री. सुनील राऊत, पंचायत समितीचे सदस्य श्री. जितेंद्र संखे, श्रीमत राजे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. नीलेश नगरकर, बजरंग दलाचे पालघर जिल्हा संयोजक श्री. चंदन सिंग, योग वेदांत सेवा समितीचे सदस्य श्री. विजय सावे, गोसेवा समितीचे अध्यक्ष श्री. अशोक राजपूत

सहकार्य

मंदिर विश्‍वस्त श्री. संजय नारखेडे यांनी सभागृह विनामूल्य दिले, तसेच वीज आणि पाणी यांचीही सोय केली. अन्य धर्मप्रेमींनी प्रकाशयोजना, ध्वनी, प्रोजेक्टर, टेबल-खुर्च्या, छायाचित्र काढणे या सेवा विनामूल्य केल्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *