भुसावळ : इसिसच्या आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करा आणि अमरनाथ यात्रेच्या अल्प करण्यात आलेल्या कालावधीला विरोध करा, या मागण्यांसाठी येथे २२ फेब्रुवारीला राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या प्रसंगी ४० हून अधिक हिंदुत्ववादी उपस्थित होते.
आंदोलनानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या वेळी भुसावळ येथील अधिवक्ता मनीष तिवारी, सर्वश्री हिरामण वाघ, शशी सुरवाडकर, उमेश जोशी, यशवंत पाटील आदी हिंदुत्ववादी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात