हिंदू संघटित नसल्यामुळेच असे आदेश काढले जातात ! अन्य पंथियांच्या संदर्भात असे आदेश कधी काढले जातात का ? असे तुघलकी आदेश देणार्या अधिकार्यांवर सरकारकडून कारवाई होण्यासाठी प्रभावी हिंदूसंघटनाची आवश्यकता आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नाशिक : नाशिक महानगरपालिकेचा कारभार हाती घेतल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दुसर्याच दिवशी कार्यालयांमधील देवतांची चित्रे हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्तांच्या स्वीय साहाय्यक कार्यालयात असलेले दत्ताचे चित्रही हटवण्यात आले आहे. त्यासोबत शहर अभियंता, अतिरिक्त आयुक्त आणि विभाग प्रमुख यांच्या कार्यालयात असलेली देवतांची चित्रेही काढून टाकण्यात आली आहेत. महापालिकेच्या भिंतींवर आता महापुरुषांचीच चित्रे ठेवण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या विविध कक्षांत, कर्मचार्यांच्या पटलांवर, भिंतींवर लावण्यात आलेली देवतांची चित्रे काढण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. आयुक्तांच्या आदेशाचे पालन करत कर्मचार्यांनी त्वरित कार्यवाहीला प्रारंभ केला आहे. यावरून नवा वाद ओढवण्याची शक्यता आहे. मुंढे यांनी अधिकार्यांना माध्यमांपासून लांब रहाण्याचा सल्ला दिला असून, ‘कोणत्याही अधिकार्याने परस्पर प्रसारमाध्यमांशी बोलू नये. महापालिकेतील सर्व बातम्या या जनसंपर्क विभाग, तसेच माझ्याकडूनच गेल्या पाहिजेत’, असे आदेश त्यांनी काढले आहेत. (पंढरपूर देवस्थानच्या अध्यक्षपदी असतांना घेतलेले निर्णय असो अथवा अन्य निर्णय असो, मुंढे यांची आजवरची कारकीर्द वादग्रस्तच राहिली आहे. नियमांच्या नावाखाली हा व्यक्ती स्वातंत्र्यावरच घाला नव्हे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
मुंढे यांनी दिलेल्या समयमर्यादेनुसार महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सुट्टीचे २ दिवस महापालिका कार्यालयाची स्वच्छता केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात