अमठाखेम (बिहार) येथे युवकांना शौर्यजागरणासाठी मार्गदर्शन
अमठाखेम (बिहार) : अत्याचारी नंदकुळाचा नाश करून चाणक्य-चंद्रगुप्त यांनी मगध साम्राज्याचा पाया रचला आणि भारताला एक राष्ट्र म्हणून पुनर्स्थापित केले. मगध साम्राज्याने इतिहासात दिलेल्या अपूर्व योगदानामुळे त्यांच्याप्रती संपूर्ण भारतवर्ष कृतार्थ आहे. चंद्रगुप्त, पुष्यमित्र शुंग या वीरयोद्ध्यांनी राष्ट्र संस्थापनेसाठी शौर्याचा इतिहास घडवला. बिहारचा युवक हा या तेजस्वी परंपरेचा वंशज आहे. आज मगध साम्राज्य विस्मरणात जाऊन अहिंसेचा प्रचार करणार्या बौद्धांचे विहार या नावाने हा प्रदेश ओळखला जात आहे. मगध साम्राज्य विस्मरणात गेल्याने संपूर्ण भारतवर्ष असुरक्षित बनले आहे. भारताला हिंदु राष्ट्र म्हणून पुनर्स्थापित करण्यासाठी मगधमधून वीरतेचे प्रदर्शन घडवणारे आधुनिक चंद्रगुप्त निर्माण व्हावेत, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी येथे केले. अमठाखेम (बिहार) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने युवकांना शौर्यजागरणाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय समितीचे उत्तरप्रदेश-बिहार समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी करून दिला. या कार्यक्रमाला ३५ जण उपस्थित होते.
या वेळी श्री. राजहंस यांनी बिहारमधील राजपूत, ठाकूर आणि यादव या क्षत्रिय वर्णियांनी हिंदु समाजाचे नेहमीच रक्षण केले आहे. वर्तमान आणि भविष्यातही क्षत्रिय कार्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. या वेळी उपस्थित युवकांनी भविष्यात दंगली आणि लव्ह जिहाद यांपासून हिंदु समाजाचे रक्षण करू अन् हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी योगदान देऊ, असा संकल्प केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे नियमित धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे निश्चित करण्यात आले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात