मळणगांव (जिल्हा सांगली) येथील धर्मसभेस धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !
मळणगांव (तालुका कवठेमहांकाळ) : हिंदूंनी धर्मावर होणार्या आघातांविरुद्ध संघटितपणे प्रयत्न करणे, ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. येथील छत्रपती शिवाजी चौक येथे ९ फेब्रुवारीला सायंकाळी ७.१५ वाजता आयोजित केलेल्या छोट्या धर्मजागृती सभेत ‘राष्ट्र आणि धर्म यांची सद्य:स्थिती आणि त्यांवरील उपाय’ या विषयावर ते बोलत होते. सभेला ३२० धर्मप्रेमींची उपस्थिती होती. सभेची संपूर्ण सिद्धता येथील धर्मशिक्षण वर्गातील धर्माभिमान्यांनी केली होती.
मळणगांवचे सरपंच तथा माजी सैनिक श्री. भगवान सूर्यवंशी, उपसरपंच तसेच कवठेमहांकाळ शिवसेना तालुका उपप्रमुख श्री. संजय चव्हाण, श्री गणेश तरुण मंडळाचे कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. चंद्रकांत भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. रमेश शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. मनोज खाडये यांचे स्वागत केले. तंटामुक्ती सभेचे माजी अध्यक्ष श्री. जगन्नाथ काटकर यांनी पुढाकार घेऊन सभेसाठी अनुमती मिळवली.
वैशिष्ट्यपूर्ण घटना
धर्मशिक्षण वर्गातील हिंदुत्वनिष्ठ श्री. आनंदराव मोरे यांनी आपल्या दुचाकीवरून मेगाफोनद्वारे आजूबाजूच्या ६ गावांत अविश्रांत परिश्रम घेऊन प्रसाराचे दायित्व सांभाळले. याविषयी श्री. मनोज खाडये यांनी विस्तृतपणे सांगून त्यांचे कौतुक केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात