Menu Close

मोदींच्या सत्तेत मुस्लिम सुरक्षित नसल्याचा शाहीद रफी यांचा आरोप !

ज्या एमआयएम पक्षाचे आमदार अकबरूद्दीन आेवैसी ‘१५ मिनीटांसाठी पोलीस हटवा, मग आम्हा २५ कोटी मुसलमानांची शक्ती १०० कोटी हिंदुंना दाखवून देऊ’ अशी उघड धमकी देतात, त्या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या शाहिद रफी यांना मोदींना बोलण्याचा काय अधिकार आहे ? शाहिद रफी अनेक ठिकाणी धर्मांध जिहादी हिंदुंवर करत असलेले हल्ले, गोरक्षकांच्या होत असलेल्या हत्या तसेच काश्मीर पंडितांची शोकांतिका याबाबत त्यांच्या ‘धर्मबांधवां’नाही काही उपदेश करणार का ? – संपादक, हिंदुजागृती

शाहीद रफी

आग्रा : अल्पसंख्यांक आणि त्यातही मुस्लिम समाज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्तेत असुरक्षित असल्याचे दिवंगत गायक मोहम्मद रफी यांचा मुलगा शाहीद रफी यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा मोहम्मद रफी यांना भारतरत्न देण्याची मागणी केली आहे.

ताज साहित्य संमेलनात बोलताना शाहीद रफी यांनी हे मत व्यक्त केले. सध्या देशात असलेली परिस्थिती व्यथित करणारी आहे. मुस्लिमांना या सरकारपासून धोका वाटत आहे. जेएनयूमध्ये घडलेली घटना असो अथवा अल्पसंख्यांकांवर झालेला हल्ला परिस्थिती चिंताजनक असल्याचे शाहीद रफी बोलले आहेत.

शाहीद रफी यांनी गेल्याच महिन्यात काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. शाहीद रफी यांनी २०१४ मध्ये एमआयएम पक्षातर्फे मुंबादेवी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. काँग्रेस धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही विचारांचा पक्ष असल्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे शाहीद रफी यांचे म्हणणे आहे.

संदर्भ : लोकमत

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *