Menu Close

ईश्‍वरपूर आणि बत्तीस शिराळा येथील हिंदुत्वनिष्ठांची मनोज खाडये यांच्याकडून सदिच्छा भेट !

ईश्‍वरपूर आणि बत्तीस शिराळा येथे हिंदुत्वनिष्ठांची भेट घेऊन मार्गदर्शन करतांना (१) श्री. मनोज खाडय

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) : येथे हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्राचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी विविध हिंदुत्वनिष्ठांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांनी हिंदूंवर होणारे अन्याय, हिंदूंवरील संकटे, हिंदु राष्ट्र का हवे, धर्मशिक्षणाची आवश्यकता या विषयांवर मार्गदर्शन केले. या वेळी वाळवा तालुका राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष श्री. सतीश इदाते, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री आदित्य माने, धनंजय भोसले, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे सर्वश्री अविनाश भोसले, मंदार चव्हाण आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बत्तीस शिराळा येथेही श्री. खाडये यांनी हिंदुत्वनिष्ठांची भेट घेतली. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे सर्वश्री सनी आवटे, रोहन म्हेत्रे, भाजपचे श्री. राजवर्धन देशमुख, श्री. शुभम देशमुख, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री ऋषिकेश भोसले, दर्शन जोशी आणि अन्य कार्यकर्ते असे एकूण १७ हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *