- जिल्ह्यातील अद्यापपर्यंतची सर्वांत मोठी कारवाई
- ३ सहस्र जनावरांची कातडी जप्त आणि ८ संशयित कह्यात
गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही न करणार्या संबंधितांवर सरकारने कारवाई करावी !
(जिल्हा नगर) – शहरातील संजयनगर भागातील, तसेच न्यू आयेशा कॉलनीच्या परिसरात हाजी मंगल कार्यालयाच्या रस्त्यावरील परिसरातील ४ पशूवधगृहांवर १३ फेब्रुवारीला नगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धाडी घातल्या. त्यामध्ये ३३७ जिवंत गायी, ३ सहस्र जनावरांची कातडी, २ टेम्पो, ६५ कत्तल झालेली जनावरे, १९ टन ५०० किलो गोवंशाचे मांस, २० सहस्र रुपयांची रोख रक्कम, जनावरे मारण्याची हत्यारे, ५ हून अधिक भ्रमणभाष संच, २१ सहस्र ५०० रुपये मूल्याचे चरबीपासून बनवलेले २१५ किलो तेल यांसह सुमारे १ कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त (शासनाधीन) केले, तसेच या वेळी पोलिसांनी ८ संशयित आरोपींना कह्यात घेतले असून अन्य पसार झाले आहेत. जिल्ह्यातील ही सर्वांत मोठी कारवाई आहे.
१. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला संजयनगर भागात मोठ्या प्रमाणावर जनावरे येणार असल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली.
२. गेल्या अनेक वर्षांपासून संजयनगर परिसरात कायम जनावरांची अवैध कत्तल केली जात होती; मात्र आतापर्यंत त्यांच्यावर केवळ दाखवण्यासाठी थातूरमातूर कारवाई केली जात होती. (अद्यापपर्यंत जनावरांच्या अवैध कत्तलीकडे दुर्लक्ष करणार्यांवरही कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)
३. कोपरगाव नगरपालिकेने या पशूवधगृहांना अनेकदा जनावरांच्या कत्तलींच्या संदर्भात नोटिसा बजावल्या होत्या; मात्र वेळोवेळी दबाव टाकून वेगवेगळ्या मार्गांनी हे प्रकरण दडपले जात होते.
४. ऐन महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी गोवंशाची कत्तल केल्यामुळे हिंदू संतप्त झाले. एवढी मोठी कारवाई झाल्याने संबंधितांचे धाबे दणाणले असून वरिष्ठ पातळीवर हे प्रकरण दडपण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे.
५. या प्रकरणी तारु इक्बाल कुरेशी, इम्रान युसुफ कुरेशी, महेताब मुख्तार कुरेशी, कामरान गल्लू कुरेशी, सानू इक्बाल कुरेशी, महंमद इस्माईल कुरेशी, शाहरुख लतीफ कुरेशी, महंमद अब्दुल कुरेशी, सलमान लतीफ कुरेशी, सलीम नजीर पिंजारी, सुखदेव बाबुराव इंगळे हे आरोपी आहेत. पोलीस मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.