निषेधसभेत उपस्थित हिंदुत्वनिष्ठ
चेन्नई : चेपॉक, चेन्नई येथे शिवसेनेच्या वतीने एक निषेधसभा आयोजित करण्यात आली होती. तमिळनाडूतील शिवसेनेचे अध्यक्ष श्री. राधाकृष्णन् यांच्या नेतृत्वाखाली ही निषेधसभा घेण्यात आली. या निषेधसभेमध्ये हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनाही सहभागी झाल्या होत्या. या वेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडे पुढील मागण्या करण्यात आल्या.
१. राज्य सरकारने बसची तिकीट दरवाढ मागे घ्यावी, जेणेकरून केवळ बसने प्रवास करणार्या गरिबांना त्याचा लाभ होईल.
२. मदुराई येथील श्री मीनाक्षीअम्मा मंदिराला लागलेल्या आगीची घटना, वेळ्ळूर येथील श्री पोन्नीअम्मा मंदिराच्या गाडीला लागलेली आग, शिवगंगाई येथील श्री कालेयार मंदिरावरील ख्रिस्ती मिशनर्यांचे आक्रमण इत्यादी प्रकरणी दोषींवर सरकारने कडक कारवाई करावी.
३. मंदिरांतील भ्रष्ट सरकारी समित्या हटवण्यात याव्यात आणि मंदिरांचे व्यवस्थापन हिंदूंकडे सोपवण्यात यावे.
४. हिंदु देवतांविषयी अवमानकारक विधान करणारे कवि वैरमुथु आणि कानिमोझी यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करण्यात यावी.
५. सनातन संस्थेला धमकीचे पत्र पाठवणार्या आरोपीचा शोध घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
या निषेधसभेमध्ये हिंदु मक्कल कत्छी, हिंदु मक्कल मुन्नानी, हनुमान सेना, भारत हिंदु मुन्नानी, हिंदु पेरियार मुन्नानी आदी हिंदु संघटनांही सहभागी झाल्या होत्या. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् आणि श्री. रविचंद्रन् सहभागी झाले होते. पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी या वेळी बोलतांना मंदिरांचे व्यवस्थापन हिंदूंकडे सुपूर्द करण्याची आवश्यकता प्रतिपादली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात