उज्जैन येथे शैव महोत्सव साजरा
उज्जैन : मंदिरे ही केवळ भक्ती आणि उपासना यांचे केंद्र नाही, तर आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक उन्नतीचे केंद्र आहे. मंदिरांमध्ये आमच्या आत्म्याला शांती मिळते आणि आम्हाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. मंदिरांना राजकीय हस्तक्षेपापासून दूर ठेवले पाहिजे, असे मत चतुर्वेदी पत्रकारिता विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. बी.के. कुठियाला यांनी येथे शैव महोत्सवात आयोजित चर्चासत्रात व्यक्त केले.
मंदिरांचा पैसा धर्मप्रसारासाठी वापरायला हवा ! – (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे
या महोत्सवात मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे म्हणाले, ‘‘सरकारच्या नियंत्रणाखालील मंदिरांचा पैसा हज यात्रा, तसेच मदरसा आणि चर्च यांना दिला जातो. हा पैसा मंदिरांना भेट देणार्या भाविकांना साधनसुविधा उपलब्ध करून देणे आणि धर्मशिक्षण देणे यांसाठी वापरायला हवा. मंदिरांचा पैसा धर्महितासाठी वापरला गेला पाहिजे. यासाठी आपण सरकारकडे आग्रह धरला पाहिजे.’’
पुरातत्वतज्ञ डॉ. नारायण व्यास म्हणाले, ‘‘शिवलिंगाची निर्मिती वैज्ञानिक आधारावर करण्यात आली आहे. त्यामध्ये ब्रह्मांड निर्मितीचे रहस्य दडलेले आहे. मंदिरांच्या शिखर कलशांमधून सकारात्मक ऊर्जा प्रक्षेपित होते. याचा प्रचार आणि प्रसार होणे आवश्यक आहे.’’
प्रेमचंद श्रृजनपीठाचे निर्देशक डॉ. जीवनसिंह ठाकूर म्हणाले, ‘‘समाजामध्ये विश्वकल्याणाची भावना वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने शिवमंदिराची उभारणी करण्यात आली.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात