- भारतातील अल्पसंख्यांकांना विनामूल्य धार्मिक यात्रा घडवणार्या सरकारला पाक आणि बांगलादेश येथील अल्पसंख्य पीडित हिंदूंचा आक्रोश का ऐकू येत नाही ?
- पाक आणि बांगलादेश येथील अल्पसंख्य हिंदू नरकयातना भोगत असतांना केंद्रातील सरकार त्यांना साहाय्य करत नाही, हे जाणा आणि जगभरातील हिंदु बांधवांच्या रक्षणार्थ आता तरी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका : ‘जिझिया कर’ न देणार्या बांगलादेशमधील मैमनसिंह जिल्ह्यातील गोविंदपूर गावात रहाणार्या एका हिंदु कुटुंबावर धर्मांधांकडून आक्रमण केल्याची घटना घडली. श्री. सुनील रबीदास आणि सौ. रीना रबीदास या कुटुंबावर १० ते १५ धर्मांधांच्या जमावाने १३ फेब्रुवारीला मध्यरात्री आक्रमण केले. या वेळी धर्मांधांनी कुटुंबातील सदस्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण करून घरातील मौल्यवान वस्तू लुटून नेल्या.
१. श्री. सुनील रबीदास आणि सौ. रीना रबीदास या कुटुंबाने नवीन घर बांधले होते. तेथे राहण्यास जाण्यापूर्वी महंमद बिलाल हुसेन, महंमद अपु मियाँ, महंमद महबुबुर रहमान आणि मंहमद रुबेल मियाँ यांनी रबीदास कुटुंबला ३० सहस्र टका (अनुमाने २१ सहस्र रुपये) एवढा ‘जिझिया कर’ मागितला.
२. हा कर देण्यास नकार दिल्याने वरील धर्मांधांनी त्यांच्या सहकार्यांसमवेत दास कुटुंबांच्या घरावर आक्रमण केले.
३. रबीदास कुटुंबाने धर्मांधांचा प्रतिकार केला असता त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली आणि घरातील सर्व मौल्यवान वस्तून लुटून नेण्यात आल्या.
४. श्री. सुनील रबीदास यांनी या घटनेविषयी गौरीपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा नोंद करण्यात आला. पोलसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली; मात्र अद्याप एकाही आरोपीला अटक केली नाही.
५. बांगलादेशमधील ‘बांगलादेश मायनॉरीटी वॉच’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे प्रमुख अधिवक्ता रवींद्र घोष यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी गौरीपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक देल्वार अहमद यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा पोलिसांनी त्यांना ‘या प्रकरणाची चौकशी चालू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल’, असे आश्वासन दिले. यानंतर अधिवक्ता रवींद्र घोष यांनी या घटनेमागे ‘अवामी लीग’ या राजकीय पक्षाच्या नेत्यांचा हात असल्याचे सांगून त्यांना अटक करावी, अशीही मागणी केली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात