योग वेदान्त सेवा समितीच्या वतीने ‘मातृ-पितृ दिन’ साजरा
जळगाव : श्री योग वेदान्त सेवा समिती च्या वतीने त्यांच्या आश्रमात १४ फेब्रुवारी या दिवशी मातृ-पितृ पूजन दिन साजरा करण्यात आला. या वेळी ह.भ.प. ज्ञानेश्वरमहाराज जळकेकर, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर उपस्थित होत्या.
शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘जळगाव मातोश्री आनंद आश्रमा’चे आणि ‘सिंधी समाज वृद्धाश्रमा’चे आई-बाबा यांचे आणि गुरुजनांचे पूजन करून मातृ-पितृ दिन नूतन मराठा महाविद्यालयाच्या प्रांगणात साजरा केला.
ह.भ.प. जळकेकर महाराज यांनी ‘आई’ची महती सांगितली, तर समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर या वेळी म्हणाल्या, ‘‘आजची तरुण पिढी पाश्चात्त्य संस्कृतीच्या आचरणाने व्यभिचाराकडे वळत असून महान अशा भारतीय संस्कृतीपासून दूर जात आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी धर्माचरणाची आवश्यकता आहे.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात