‘चोर तो चोर वर शिरजोर’ या वृत्तीचा पाक !
पाकसमवेत चर्चेची भाषा करणार्या पीडीपीच्या नेत्या तथा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना याविषयी काय म्हणायचे आहे ? पाकला नष्ट करणे, हाच या समस्येवरील अंतिम उपाय आहे, हे सरकारने जाणावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
इस्लामाबाद : भारताने पाकशी शांतता राखण्याची, तसेच मैत्रीचे संबंध सुधारण्याची संधी गमावली आहे. म्हणूनच आता शांतता नांदणे अशक्य आहे, असे वक्तव्य पाकचे संरक्षणमंत्री खुर्रम दस्तगीर खान यांनी ‘सिनेट’च्या बैठकीत केले.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानमध्ये भारताशी संबंध सुधारण्यासाठी राजकीय एकमत झाले होते; पण भारताकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. सुंजवान येथील आक्रमणानंतर भारताच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन् यांनी पाकला कठोर चेतावणी दिली होती. त्यावरही खुर्रम यांनी वरील विधान केले. जानेवारी २०१८ पासून आतंकवाद्यांनी २०० हून अधिक वेळा सीमारेषेचे उल्लंघन केले आहे.
पाककडून आतंकवादी संघटनांवर कारवाई करण्यासाठी कायद्यात पालट !
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने बंदी घातलेल्या पाकमधील लष्कर-ए-तोयबा, अल्-कायदा, तालिबान अशा आतंकवादी संघटनांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यासाठी पाक सरकारने आतंकवादविरोधी कायद्यात दुरुस्ती केली असल्याचे सांगण्यात आले. (ही जगाच्या डोळ्यांत धूळफेक आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात