कोल्हापूर : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात जिल्ह्यातील हुपरी आणि मुरगूड येथे पोलीस उपनिरीक्षक अन् महाविद्यालयाचे प्राचार्य यांना निवेदन देण्यात आले.
हुपरी
येथे पोलीस उपनिरीक्षक श्री. नामदेव शिंदे यांना निवेदन दिल्यानंतर ते म्हणाले, ‘‘मुळातच ‘व्हॅलेंटाईन डे’ हा दिवस साजरा करणे, ही आपली संस्कृती नाही. तुम्ही चांगले काम करत आहात. या परिसरात अशा काही घटना आढळल्यास मला संपर्क करावा. मी त्यांचा बंदोबस्त करीन.’’
येथील जनता माध्यमिक आणि ज्युनिअर महाविद्यालय, शेंडुरे महाविद्यालय, पारीसन्ना इंग्रोले महाविद्यालय येथे ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात निवेदन देण्यात आले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठानचे सर्वश्री प्रवीण पाटील, नितीन खेमलापुरे, पोपट हांडे, धर्मप्रेमी अवधूत लोहार, राजू सुतार, सचिन पाटील, किरण कोळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे उपस्थित होते.
मुरगूड
येथे पोलीस उपनिरीक्षक यासह शिवराज विद्यालय, शिवराज ज्युनिअर महाविद्यालय, सदाशिवराव मंडलिक सिनियर महाविद्यालय, मुरगूड विद्यालय, मुरगूड ज्युनिअर महाविद्यालयांमध्ये निवेदन देण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी सर्वश्री प्रवीण सुतार, मदवानन्द पाटील, सूरज पाटील, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी ‘तुम्ही तरुण असूनही ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात प्रबोधन करत आहात, हे कौतुकास्पद आहे. मुरगूड परिसरात प्रथमच असा प्रयत्न हेत आहे’, अशा शब्दांत या हिंदु जनजागृती समितीच्या मोहिमेचे कौतुक केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात