अशा घरभेद्या राष्ट्रद्रोह्यांना छत्रपती शिवरायांच्या राज्यातील कायद्यांप्रमाणे अतीकडक शासन हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : खोटे पॅनकार्ड, आधारकार्ड, वाहनचालक परवाना, मतदार ओळखपत्र आदी बनावट कागदपत्रे सिद्ध करून देणार्या दोघांना गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मशीद बंदर परिसरातील एका दुकानात धाड टाकून अटक केले. खोटी कागदपत्रे विकत घेणार्यांनी जे पत्ते दिले आहेत, त्यामध्ये अॅन्टॉप हिल येथील झोपडपट्टीचा पत्ता आहे; मात्र पोलिसांनी या पत्त्यावर शोध घेतला असता तेथे त्या नावाची कुणीही व्यक्ती नसल्याचे पुढे आहे आहे. ओळखपत्रावर दिलेले पत्ते खोटे असून बनावट ओळखपत्र घेणारे घुसखोर बांगलादेशी असल्याचे पोलीस अन्वेषणात समोर आले आहे.
सुनील चौधरी हा मूळचा बिहार येथील रहाणारा असून मागील २ वर्षांपासून तो अताउल्ला याच्या साहाय्याने अशी खोटी कागदपत्रे सिद्ध करत आहे. तो १ ते १० सहस्र रुपयांमध्ये ही बनावट ओळखपत्रे विकत होता. धाड घातलेल्या दुकानातून पोलिसांनी असंख्य कोरी आधारकार्ड, मतदान ओळखपत्र यांसह कोरे स्मार्टकार्ड आणि मास्टरकार्ड यांचा साठा जप्त केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात