पुणे : जगातील सर्वच धर्म शांती, समता प्रस्थापित करण्यास सांगतात. माझा धर्म मला घराच्या उंबरठ्याबाहेर का आणायचा आहे ? त्याचे प्रदर्शन कशाला ? धर्माच्या नावावर गंध लावणारे आणि दाढी वाढवणारे मला भीती दाखवतात, असे विधान निखिल वागळे यांनी केले. (हिंदूंनी कपाळाला गंध लावणेही बंद करावे, असे वागळे यांना सांगायचे आहे का ? अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा ढोल बडवणार्यांना धर्मपालनाचे स्वातंत्र्य मान्य नसेल, तर ते संविधानाच्या विरोधातच आहेत असे म्हणायचे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१५ फेब्रुवारी या दिवशी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पुणे ने आयोजित केलेल्या ‘उगम २०१८’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी अनेक जातीद्वेषमूलक, असंबद्ध आणि अविवेकी विधाने केली. ते पुढे म्हणाले की,
१. गांधी स्वतःला सनातन हिंदु म्हणवत. सनातन म्हणजे आजचे सनातन नव्हे. (सनातन संस्थेच्या नावात ‘सनातन’ शब्द असल्याचाही तिटकारा वाटणारे वागळे सनातन हिंदुत्वाविषयी बोलतात, हेच हास्यास्पद आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) आंबेडकरांना स्वातंत्र्यातून समता प्रस्थापित करायची होती. गांधी हे हिंदु समाजाचे सर्वांत मोठे प्रतिनिधी होते आणि हेच हिंदुत्वाच्या नावावर विष पसरवणार्यांना मान्य नव्हते. ते हिंदु धर्माचे प्रवक्ते झाले असते, तर यांची पोटं कशी भरली असती ?
२. मोहसीन शेखला हिरव्या रंगाचा शर्ट घातला म्हणून मारले. (मोहसीन शेखची हत्या हिरव्या रंगाचे कपडे घातल्यामुळे झाली, असे कुठेही सिद्ध झालेले नाही. अशी विधाने करून वागळेंना काय साध्य करायचे आहे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) अखलाकला गोमांस बाळगल्याच्या प्रकरणी मारण्यात आले. सर्वांत अधिक मांस निर्यात करणारे जैन आहेत.
३. मला नाईलाजास्तव म्हणावे लागत आहे की, हा बहुसंख्य हिंदूंचा देश आहे आणि ते सहिष्णू असल्याने हा देश टिकून आहे. (केवळ हिंदु राष्ट्राच्या मागणीनेच तथाकथित पुरो(अधो)गाम्यांच्या तोंडून सत्य बाहेर पडत आहे. हाच हिंदु राष्ट्राचा परिणाम आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
४. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह झाल्यासच हिंदूंमधील जातीची आणि धर्माची मुळे खिळखिळी होतील. (यावरून वागळे यांचा हेतू हिंदु धर्माला नष्ट करणे हा आहे, हे स्पष्ट होते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) धर्माधारित राज्यात महिलांनी खळखळून हसू नये असे सांगितले आहे. म्हणून हसण्यालाही आज विरोध होतो आहे.
५. मराठी भाषा शुद्धच हवी, असा अट्टाहास का ? तुम्ही तुमची भाषा आमच्यावर थोपवू नका. शुद्धतेचे सोवळे काढून टाका. (वागळे यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येकाला मराठी भाषा परिपूर्ण यावी यासाठी प्रयत्न करणारे सर्व भाषातज्ञ, मराठी कवी, लेखक मूर्ख आहेत का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)कांजरभाट समाजात कौमार्य चाचणी होते तेव्हा, भटजी विचारतो की, आपला माल कसा आहे ? मनुस्मृतीची शिकवण कशी आहे ते पहा. (याचा मनुस्मृतीशी काय संबंध ? मनु हा ब्राह्मण नव्हे, तर क्षत्रिय होता हेही माहीत नसलेले वागळे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात