Menu Close

बांगलादेशमध्ये धर्मांधांनी श्री कालीमाता मंदिरातील ५ मूर्तींची तोडफोड करून मंदिर पेटवले

  • कुठे एक प्रार्थनास्थळ पाडल्याच्या विरोधात संघटित होणारे जगभरातील अन्य पंथीय, तर कुठे बांगलादेश आणि पाक या इस्लामी राष्ट्रांतीलच काय; पण भारतातील हिंदूंवर होणार्‍या अन्यायाच्याही विरोधात संघटित न होणारे निद्रिस्त जन्महिंदू !
  • पाक आणि बांगलादेश येथील हिंदूंवर सातत्याने आघात होऊनही भारत सरकार त्याविषयी एक शब्दही बोलत नाही, हे लक्षात घ्या ! जगभरातील हिंदूंच्या रक्षणार्थ आता हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

ढाका : बांगलादेशमधील नौखाली जिल्ह्यात असलेल्या उत्तर महंमदपूर गावातील श्री कालीमाता मंदिरात धर्मांधांनी ५ मूर्तींची तोडफोड केली. याशिवाय येथील लाकडी मखराला आग लावून मंदिर पेटवून दिले. यामुळे मंदिराची मोठ्या प्रमाणात हानी झाली, अशी माहिती बांगलादेशमधील बांगलादेश मायनॉरिटी वॉच या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे प्रमुख अधिवक्ता रवींद्र घोष यांनी दिली.

अधिवक्ता रवींद्र घोष पुढे म्हणाले, दुसर्‍या दिवशी सकाळी या मंदिरात नेहमीप्रमाणे स्वच्छता करण्यास गेलेल्या श्रीमती लोनी बाला दास यांनी मूर्तींची तोडफोड झाल्याचे, तसेच मंदिर पेटवून दिल्याचे लक्षात आले. त्यांनी आरडाओरड केल्यामुळे परिसरातील हिंदू गोळा झाले.

मंदिरातील सेवेकरी श्री मोलोय बिश्‍वास यांनी या प्रकरणी सेनबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि चौकशी चालू केली. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. बांगलादेश मायनॉरिटी वॉचला या घटनेची माहिती मिळताच अधिवक्ता घोष सेनबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षकांशी संपर्क साधला. त्यांनी या घटनेची नोंद घेतल्याचे सांगून चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले. या घटनेमुळे स्थानिक हिंदूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अधिवक्ता रवींद्र घोष यांनी घटनेस उत्तरदायी असलेल्या आरोपींना त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. हिंदूंच्या मंदिरावर होत असलेल्या वाढत्या आक्रमणाविषयी चिंता व्यक्त करून त्यांनी अल्पसंख्यांक हिंदूंच्या धार्मिक हक्कांचे रक्षण करावे, असेही आवाहन सरकारला केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *