शासनाने ठोस उपाययोजना करावी यासाठी ठाणे जिल्हाधिकार्यांना स्वाक्षर्यांचे निवेदन
ठाणे : उत्तरप्रदेशमधील कासगंज जिल्ह्यातील ‘तिरंगा यात्रे’वर धर्मांधांनी केलेली दगडफेक, ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा आणि तिरंग्याचा केलेला अवमान अन् अभाविपचे चंदन गुप्ता यांसारख्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्या यांचा निषेध करत ठाणे जिल्ह्यात महाशिवरात्रीच्या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या माध्यमातून स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले. या वेळी हा विषय लोकांना समजावून देत शासनाला देण्यात येणार्या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षर्या घेण्यात आल्या. या ८९६ स्वाक्षर्यांचे निवेदन १६ फेब्रुवारी या दिवशी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या नावे निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती वंदना सूर्यवंशी यांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने सुपुर्द करण्यात आले.
देशद्रोही धर्मांध आतापर्यंत दगडफेक आणि चाकू-तलवारी यांनी आक्रमण करायचे, आता ते गोळीबारही करू लागले आहेत, त्यांच्या घरांमध्ये देशी बॉम्ब आणि पिस्तुले मिळू लागली आहेत, तसेच अभाविपचे चंदन गुप्ता यांसारख्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्या होऊ लागल्या आहेत. या घटना धर्मांधांची समाजविघातक आणि देशद्रोही मानसिकता दर्शवतात. त्यामुळे याप्रकरणी ठोस कारवाई करून या प्रकरणाच्या सूत्रधारांना त्वरित अटक करावी, देशविरोधी घोषणा देणार्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी नवीन कायदा करावा, कासगंज येथून अटक केलेल्या मुसलमानांच्या घराची झडती घ्यावी, या प्रकरणातील आरोपी सलीम याच्या घरी बॉम्ब आणि पिस्तुल कशासाठी ठेवली होती, यामागे आतंकवादी हल्याचा कट तर नाही ना याचा तपास करावा, चंदन गुप्ता यांचा मृत्यू यात्रेच्या वेळी झाला असल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक साहाय्य द्यावे. या मागण्या जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केल्या आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात